संचारबंदीचा फायदा घेऊन अवैधरित्या दारु विक्री करणा-यास मुद्देमालासह अटक
लाॅकडाऊन कालावधीत पोलीस बंदोबस्तात व्यस्त असताना, अवैध दारु व्यावसाईक या संधीचा फायदा घेऊन, अवैध व्यवसाय सुरु ठेवतील, अशा अवैध व्यावसाईकांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक डाॅ. मोहीतकुमार गर्ग यांनी दिले होता.
त्यानुसार या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. शशीकिरण काशीद व खेड पोलीस ठाण्याच्या पोनि. निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना, गुप्त बातमीदाराकडून विश्वसनीय माहीती मिळाली की, मौजे चिचंघर, वेताळवाडी, ता.खेड येथील राहणारा संतोष अशोक कदम हा सध्या कोविड-१९ च्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरु असल्याचा फायदा घेवून, त्याचे घराचे पाठीमागे मोकळया जागेत गैरकायदा बिगरपरवाना देशी-विदेशी बनावटीच्या कंपनीची दारु कब्जात बाळगुन, बाजारतील वैध दुकानातील दरापेक्षा अधिक भावाने ग्राहकांना बेकायदेशीर रित्या विक्री करत आहे. सदर बाबतची माहीती मिळताच सपोनि. सुजित गडदे व तपास पथक अंमलदार पोना.विरेंद्र आंबेडे, पोशि.संकेत गुरव, पोशि.साजिद नदाफ, पोशि.अजय कडू, मपोकॉ.सीमा मोरे यांचेसह दि.११/०४/२०२१ रोजी १९.४५ वा. चे सुमारास संतोष अशोक कदम, वय-३० वर्षे, मौजे चिंचघर, वेताळवाडी, ता.खेड याचे घराचे परिसरात धाड टाकुन गोवा बनावटीची विदेशी दारु गैरकायदा बिगरपरवाना लोकांना चढ्या भावाने विक्री करणेसाठी त्याचे ताब्यात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ पकडून रु.३०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला व त्याचे विरुद्ध खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.९४/२०२१, महाराट्र दारुबंदी कायद्याचे कलम ६६(१)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आलीआहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
www.konkantoday.com