
कुणबी विकास सेवा संघातर्फे एप्रिलमध्ये कुणबी चॅम्पियन चषक स्पर्धा
दापोली तालुक्यातील आसोड सातगाव गटाच्या वतीने २० ते २१ एप्रिल या कालावधीत दिवा-उसरघर येथील किंग मैदानात कुणबी चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेतील विजेत्यास २५ हजार रुपये, उपविजेत्यास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ६ हजार रूपये, चतुर्थ क्रमांकास ४ हजार रुपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांनाही गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील असोंड, रूखी, टेटवली, शिवनारी, शिवाजीनगर, कोळबांद्रे, सडवे आदी गावातील संघ सहभागी होणार आहेत.www.konkantoday.com