
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठीचे होम आयसोलेशन बंद करण्याबाबत सोमवारी निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठीचे होम आयसोलेशन बंद करण्याबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. ही माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, जिल्हाधिकारी आढावा बैठक सोमवारी (ता. १२) घेणार आहेत. यात कोरोना नियंत्रण उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. यावेळी होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील वसतिगृहे व महाविद्यालये अधिगृहित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
www.konkantoday.com