
*कोकणात तुती व रेशीम शेतीकडे वळलेल्या शेतकर्यांना बळ मिळणार*
*_रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला आणि शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याचे सामर्थ्थ असलेल्या रेशीम शेतीला चालना देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुती रेशीम विकास कार्यक्रम राबविला जात असताना आता केंद्र सरकार देखील रेशीम शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने तुती व वन्य रेशीम उद्योग विस्तार व विकासाकरिता सिल्क समग्र-२ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे नजिकच्या काही वर्षामध्ये कोकणात तुती व रेशीम शेतीकडे वळलेल्या शेतकर्यांना बळ मिळणार आहे.रेशीम उद्योग हा शेती व वन संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. राज्यामधील हवामान हे रेशीम शेतीसाठी पोषक आहे. वातावरणाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरत आहे.www.konkantoday.com