रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात येईल -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

कोरोना रुग्णांवरील उपचारात ऑक्सिजनचा पुरवठा महत्त्वपूर्ण असल्याने, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सद्यस्थितीत ऑक्सिजन सुविधा असलेले ६१७ बेड आहेत. त्यामुळे अशा बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्सिजन तयार करणारा प्लँट जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजून खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याइतकी स्थिती रत्नागिरीमध्ये आलेली नाही, असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button