
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी माध्यमांमध्ये भूमिका मांडण्यात पक्ष कमी पडल्याने शरद पवार यांची नाराजी
सिल्वर ओक इथे झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसल्याने पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी माध्यमांमध्ये भूमिका मांडण्यात पक्ष कमी पडल्याने पवारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.
सीबीआय चौकशीस अनिल देशमुख सामोरे जातील तेव्हाही पक्ष पाठीशी राहील असे पवारांनी बैठकीत स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com