
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या पाठीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपासून त्यांच्या पाठीला त्रास होत होता. त्यानंतर आज त्यांच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. काही दिवसांपूर्वी टेनिस खेळताना त्यांच्या पाठीला मुकामार लागला होता. त्यावेळी त्यांच्या हातालाही दुखापत झाली होती. गेले काही दिवस त्यांची पाठ दुखत होती. पाठदुखी थांबावी यासाठी त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध-गोळ्या घेतल्या होत्या, पण त्या औषधांनी त्यांना बरं वाटलं नाही. त्यामुळे अखेर त्यांना शनिवारी सकाळी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
www.konkantoday.com