बेकायदेशीररीत्या प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याने पर्ससीन नेट मच्छीमार आंदाेलनाच्या तयारीत
समुद्रातून मासेमारी करून येणाऱ्या नौकांना मासळी उतरविण्यासाठी मिरकरवाडा बंदरात येण्याची अनुमती असतानादेखील बेकायदेशीररीत्या प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप पर्ससीन नेट मालकांकडून केला जात आहे ही जर कारवाई थांबली नाही तर येत्या सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून १२एप्रिल रोजी लाक्षणीक उपोषण करण्याची परवानगी मागण्यात आली आहे
www.konkantoday.com