
भाजप ओबीसी शहराध्यक्षपदी श्री. अमित विलणकर यांची नियुक्ती.
भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी शहराध्यक्षपदी श्री. अमित विलणकर यांची निवड करण्यात आली आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. नियुक्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून त्यांच्या सत्कार व अभिनंदनाने संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.राजेश सावंत यांच्या हस्ते भाजप ओबीसी शहराध्यक्षपदी श्री. अमित विलणकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, युवा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, तसेच पदाधिकारी मनोज पाटणकर, राजू भाटलेकर, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, शैलेश बेर्डे, समीर वस्ता, नितीन जाधव आदींसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री अमित वीलणकर यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, ओबीसी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटनेत ऊर्जा व बळकटी आली आहे हे नक्की.




