रत्नागिरी जिह्यात नेहमीच्या तापमानापेक्षा वाढ राहणार
मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरीत जिल्ह्यात वातावरणात बदल दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी झाले असून मंगळवारपासून मळभाचे आच्छादन दिसू लागले आहे. एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने अधिक तापमानाचे मानले जातात. मात्र, यावर्षी या कालावधीतील तापमानापेक्षा साधारणत: एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढलेले राहील, असा अंदाज दापोल हवामान सल्ला केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.
www.konkantoday.com