येत्या दोन दिवसांत रत्नागिरी शहरात पाणीपुरवठा चांगल्या दाबाने व सुरळीत होणार – नगराध्यक्ष बंड्या साळवी
गेले दोन दिवस रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, कालपासून सुरळीत झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असला तरी येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा चांगल्या दाबाने व सुरळीत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी दिली.
शीळ धरण येथे दोन पंप बसविण्यात आले असून, २४ तास पंप चालवूनदेखील पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लोव्ह होत नव्हत्या. मात्र, नवीन पंपामुळे टाक्या काही तासांतच भरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. मात्र, त्यानंतर शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे.
www.konkantoday.com