
हवामानाच्या बदलामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण, दापोलीत ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे २२ रूग्ण आढळले
हवामानाच्या बदलामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. दापोलीत दररोज रूग्णालयात ताप, सर्दी, खोकला अशा आजारांचे रूग्ण वाढत आहेत. तसेच दापोलीत ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या २२ रूग्णांनी उपचार घेतल्याचे उपजिल्हा रूग्णालयाकडून समोर आले आहे.
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबर हिटने दापोलीकर हैराण झाले. यात हवामान बदलामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले. तसेच डासांच्या उपद्रवामुळ तालुक्यातील २२ रूग्णांना डेंग्यूचा सामना करावा लागला. यात ९ रूग्णांना उपचारासाठी बाहेर पाठवण्यात आले तर १३ रूग्णांना पूर्णतः उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे उपजिल्हा रूग्णालयाकडून सांगण्यात आले. अनेकांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेतल्याने त्यांची आकडेवारी उपलब्ध होवू शकली नाही.
www.konkantoday.com