
लोकशाही की दडपशाही ?सनदशीर मार्गाने देखील व्यापाऱ्यांनी निषेध करायचा नाही?व्यापाऱ्यांच्यात संताप
शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे आवश्यक सेवा वगळून अन्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याच्या अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने आज केली मागील लॉक डाऊनच्या काळापासून व्यापारी अडचणीत आले आहेत त्या काळात शासनाने वीजबिलापासून इतर करातही कोणतीही सवलत दिली नाही बँकेनेही वसुलीसाठी व्यापाऱ्यांची पाठ सोडली नाही त्यातच आता शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे मध्यम व छोटे व्यापारी आणखीनच अडचणीत आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे व्यापाऱ्यांची आमच्या पोटावर मारू नका अशी मागणी आहे अन्य व्यवहार चालू ठेवून फक्त ठराविक दुकाने बंद ठेवून करोना कसा काय रोखला जाणार आहे हा त्यांचा साधा प्रश्न आहे आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द त्यांनी सनदशीर मार्गाने निषेध सुरू केला आहे प्रशासनाने दुकाने बंद केल्यानंतर रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या वतीने बंद दुकानासमोर शांतपणे व सनदशीर मार्गाने निषेध फलक घेऊन आपल्याला आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या वतीने शहरात दोन ठिकाणी अधिकृत होर्डिंगवर बॅनर लावून शासनाने घातलेल्या बंदीबाबत व्यापारी संघाच्यावतीने विरोध दर्शविला होता परंतु आज नगर परिषद प्रशासनाने हे बॅनर काढून टाकले यामुळे व्यापार्याच्यात संतापाची लाट उसळली आहे शहरातील व्यापारी स्वतःच्या कष्टाने व प्रामाणिकपणे पैसे मिळवत असल्याने पैसे मिळवण्यासाठी कितीही कष्ट करावे लागतात याची त्यांना कल्पना आहे व त्यांच्यावर अनेक कुटूंबे अवलंबून असल्याने दुकाने चालू करावीत ही त्यांची प्रामाणिक भावना आहे आपली मागणी शासनापर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचावीत यासाठी ते प्रयत्न करीत आहेत असे असताना नगरपरिषद सत्ताधाऱ्यांकडून दडपशाही करून हे बॅनर काढून टाकल्याने व्यापाऱ्यांच्यात तीव्र संताप निर्माण झाला आहे लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी आता परवानग्या घ्याव्या लागणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे?रत्नागिरीत नव्याने निवडून आलेल्या व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी या अन्यायाबाबत आपली भूमिका ठामपणे मांडून त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे तसेच लोकशाही मानणार्या प्रत्येक नागरिकाने अशा वृत्तीचा निषेध करणे आवश्यक आहे
www.konkantoday.com