रत्नागिरी पोलिसांकडून उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकाने उघडणाऱ्यांवर कारवाई होणार
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने नवीन नियमावली केली असून त्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळून अन्य दुकाने तीस एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत आज अंमलबजावणीबाबत प्रशासन पातळीवर वेगवेगळ्या बैठका झाल्या नामदार उदय सामंत यांनी देखील निर्णयाची कडक अंमलबजावणी करा अशा सूचना पोलीस खात्याला व प्रशासनाला दिल्या आहेत त्यामुळे आज पोलिस प्रशासनातर्फे रिक्षा फिरवून या नियमांबाबतची माहिती देण्यात आली मात्र उद्यापासून अशाप्रकारे दुकाने उघडी दिसली तर त्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिस खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहेत रत्नागिरीचे डीवायएसपी सदाशिव वाघमारे यांनी आज रत्नागिरी शहर व तालुका व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांना बोलावून याची कल्पना दिली आहे या वेळी तालुका महासंघाचे अध्यक्ष निखिल देसाई व शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे व अन्य सदस्य उपस्थित होते त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे उद्यापासून कडक अंमलबजावणी होणार आहे
www.konkantoday.com