
कोव्हिड स्थिती पाहून खास बाब म्हणून जिल्ह्यातील काही निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करु -नामदार उदय सामंत यांचे सिंधुदुर्गातही आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. कुडाळ, कणकवली आणि मालवण हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेले सर्व निर्बंध काटेकोर पाळणे आवश्यक आहे. या आठवडाभरासाठी सर्व जिल्हावासीय व व्यापार्यांनी कडक निर्बंध पाळावेत. आठवडाभरानंतर जिल्ह्यातील कोव्हिड स्थिती पाहून खास बाब म्हणून जिल्ह्यातील काही निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
www.konkantoday.com




