कोविड रुग्णालयांसाठी नवीन इमारती घेऊन तज्ञ फिजिशियन नेमण्यात यावेः समविचारींची मागणी
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रत्नागिरी शहरात उपलब्ध रुग्णालय इमारती रुग्ण संख्येच्या मानाने कमी पडत असून कोविड रुग्णालयासाठी नवीन इमारतींची उपाययोजना करावी, आणि सर्वप्रथम तज्ञ फिजिशियन नेमण्यात यावेत, अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचने दिला आहे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात शासकीय महिला रुग्णालय, जिल्हा समाजकल्याण इमारत, बी एड् कॉलेज, येथील सर्व इमारती कोविड बाधित रुग्ण संख्येने भरले असून नवीन रुग्णसंख्या पहाता नवीन कोविड रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. असे नमूद करून, जिल्हा स्तरावर अद्यापही वारंवार मागणी करुनही एकही फिजिशियन तज्ञ उपलब्ध नाही ही बाब संतापजनक असून ही पदे तात्काळ भरण्यात यावीत अन्यथा उपोषणादी मार्गांचा अवलंब करावा लागेल असा इशारा सर्वस्वी बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, राज्य युवा अध्यक्ष निलेश आखाडे, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी कुलकर्णी, तालुकाध्यक्ष साधना भावे आदींनी दिला आहे.
www.konkantoday.com