अर्थ चक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल -मनसेचे नेते संदीप देशपांडे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात आता सक्तीने दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात संतापाची भावना आहे. काल मुंबईच्या अनेक भागात व्यापारी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यापाऱ्यांना दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्या, असे म्हटले होते.मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सूचक टि्वट केले आहे.अर्थ चक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल हे आम्ही आधीच सांगितलं होतं. दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने सुधारणा करावी अन्यथा….. ” असे टि्वटमध्ये म्हटले आहे.
www.konkantoday.com