नामदार उदय सामंत व पालकमंत्री अनिल परब यांच्या प्रयत्नातून नियोजन मंडळातून रत्नागिरी पोलिस पोलीस दलासाठी ११ बोलेरो आणि २५ मोटरसायकली
रत्नागिरी पोलिस दलाकरता अत्याधुनिक अशा वाहनांची गरज होती. त्याकरता तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी या गाड्या मिळाव्यात म्हणून हालचाली सुरू केल्या. साऱ्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कानावर याबाबतच्या गोष्टी आल्या. यामध्ये जरा देखील वेळ न दवडता ना. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून निधी देता येईल का? याची चाचपणी सुरू केली. ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश देखील आलं. या साऱ्यामध्ये ना. उदय सामंत यांनी पुढाकार घेत विद्यमान पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संवाद साधत पोलिसदलासाठी या गाड्या किती महत्त्वाच्या आहेत याचा वृत्तांत मांडला. ना. उदय सामंत यांच्या या कल्पनेला आणि तळमळतेनं केलेल्या प्रयत्नांना यश आलं. ह्यामध्ये रत्नागिरी चे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा ह्यांचे देखील महत्वाचे योगदान होते. जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री अनिल परब यांनी लगेगच ना. उदय सामंत यांच्या प्रस्तावाला संमती देत कार्यवाहीकरता हिरवा कंदील दर्शवला. परिणामी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ६७ लाख रूपये संमत करत गाड्या खरेदीच्या हालचाली सुरू झाल्या. या प्रयत्नांना यश येत जिल्हा पोलीस दलासाठी ११ बोलेरो आणि २५ मोटरसायकल विकत घेतल्या गेल्या. रत्नागिरीमधील नाईक मोटर्सचे संचालक नजीर नाईक यांनी या गाड्यांच्या चाव्या विद्यमान जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याकडे सुपूर्द देखील केल्या.
www.konkantoday.com