रत्नागिरी बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यास सुरुवात,किमान एक आठवडा तरी दुकाने बंद राहण्याची शक्यता
शासनाच्या नव्या निर्बंधामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने व हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे हॉटेल्सना पार्सल सुविधा देण्यास मान्यता देण्यात आली आहे
दरम्यानव्यापाऱ्यांनी या निर्बंधाला विरोध सुरू केला होता जिल्हाधिकारी कार्यालयात नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रशासनाची बैठक झाली या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने नियमांचे पालन करण्याचे आवाहन सामंत यांनी केले त्याचबरोबर शासनाने घालून दिलेले निर्बध कडक पाळण्याचे व आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासन व पोलिस विभागाला दिले रत्नागिरी येथील व्यापारी व सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांची जी भावना आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत व मुख्य सचिवांपर्यंत पोहोचवू असेही त्यांनी आश्वासन दिले त्यामुळे आता एक आठवडा तरी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत त्यानंतर आता प्रशासनाकडून रिक्षा फिरवून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनीही हळूहळू दुकाने बंद करण्यास सुरुवात केली आहे
www.konkantoday.com