
रत्नागिरी जिल्हा महिला रुग्णालय कोविड सेंटरला भेट देऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी घेतला आढावा
रत्नागिरीतील वाढते कोरोना रुग्ण हि अत्यंत चिंताजनक बाब आहे.या पार्श्वभूमीवर उपलब्ध आरोग्य सुविधा आणि भविष्यात पेशंट वाढल्यास करावे लागणारे अतिरीक्त नियोजन यासाठी रत्नागिरीचे आमदार मंत्री महोदय उदय सामंत* यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली तसेच रुग्णांना सद्यस्थितीत मिळणारी आरोग्य सेवा याचा सविस्तर आढावा घेतला. दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्णसंख्या लक्षात घेता याच हॉस्पिटलमध्ये आणखी शंभर बेड वाढवण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.तसेच रात्रंदिवस अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना हॉस्पिटल नजीकच थोडीशी विश्रांती घेता यावी म्हणून अपूर्ण असलेल्या स्टाफ कौर्टर्स मधील काही रूमची कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम उप अभियंता पुजारी मॅडम यांना दिले.या वेळी आपल्या रुग्णाच्या काळजीपोटी रुग्णालयाच्या आवारातच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी एखादा हॉलची व्यवस्था करावी अशाही सूचना दिल्या.मंत्री महोदयांनी उपलब्ध औषध साठा, ऑक्सिजन चा साठा याचाही आढावा घेतला. या पाहणी आणि आढावा दौऱ्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले, रुग्णालयाचा स्टाफ, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता पुजारी मॅडम, प्रांत सूर्यवंशी, तहसीलदार जाधव इत्यादी शासकीय अधिकारी वर्गा समवेत माजी आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, शिवसेना रत्नागिरी शहर अध्यक्ष बिपीन बंदरकर, पंचायत समिती रत्नागिरीचे उप सभापती उत्तम सावंत यांचीही उपस्थिती होती.
www.konkantoday.com