
कोकण रेल्वेमार्गावर विजेवर मालगाडी धावली
कोकण रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी रोहा ते रत्नागिरी सीआरएस (कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी) तपासणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच पहिली मालगाडी विजेवर चालवण्यात आली. ही गाडी विना अडथळा धावल्यामुळे पुढे टप्प्याटप्प्याने प्रवासी गाडी चालवून पाहण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com




