आंबा, काजू उत्पादित मालाला ठोस हमीभाव देवून शासनाने खरेदी करण्याची समविचारीची मागणी.
आंबा, काजू उत्पादकांना हमी भाव देऊन उत्पादित माल शासनाने खरेदी करावा अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोनामुळे पर्यटक संख्या अल्प प्रमाणात आहे, बदलत्या हवामानाचा विशेषतः वाढत्या उष्णतेचा परिणाम आंबा पीकावर झाला आहे. त्यातच लॉकडाऊनच्या परिणामी उत्पादित माल पडून आहे यासाठी कृषी उत्पन बाजार समिती, जिल्हा कृषी विभाग यांनी माल विक्रीसाठी पुढाकार घ्यावा आणि आंबा उत्पादनाला शासनाने ठोस हमीभाव देऊन माल विक्रीसाठी मदत करावी अशीही मागणी समविचारीने निवेदनाआधारे केली आहे.
शासनाने हेक्टरी नुकसानीचा तपशील न करता गुंठ्यावर करावा तसेच ज्यांनी ज्यांनी आंबा व्यवसायासाठी कराराने बागा घेतलेल्या आहेत अशांचाही विचार शासनाने प्राधान्याने करावा. असे समविचारीचे बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर राज्य युवा अध्यक्ष निलेश आखाडे, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी कुलकर्णी, तालुकाध्यक्ष साधना भावे आदींनी केली आहे.
www.konkantoday.com