सरकारने सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले असले तरी काही घटकांना सूट
करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले असले तरी काही घटकांना सूट देण्यात आली आहे. घरकाम करणारे, स्वयंपाकी, परीक्षार्थी, वाहन चालकांना रात्री ८ नंतर तसेच शनिवार व रविवार संपूर्ण टाळेबंदीच्या काळात ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी रेल्वे, विमान प्रवासास मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या वतीने सोमवारी रात्री नवा आदेश लागू करण्यात आली.
www.konkantoday.com