
शासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधात दुकाने व बाजारपेठेबाबतच्या निर्णयाबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध घालण्याचे जाहीर केले असून तशी नियमावली जाहीर केली आहे या नियमावलीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने व बाजारपेठा ३० एप्रिल बंद राहतील असे जाहीर केले आहे याच नियमावलीत हॉटेल बंद असली तरी त्यांना पार्सल सुविधा देण्याची परवानगी देण्यात आली आहे तसेचरस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या खाद्यविक्री करणार्या टपऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे एवढेच नव्हे तर ज्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी होते ते किनारे फक्त शनिवार रविवारी व रात्री आठ ते सकाळी सात बंद ठेवण्यात आले आहेत शासनाने अर्थचक्र थांबणार नाही असे जाहीर केले आहे मात्र बाजारपेठा व दुकाने सुरू ठेवायची की नाहीत याबाबत स्पष्ट निर्णय कळत नसल्याने व्यापाऱ्यांच्यात संभ्रम वाढला आहे आता स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत व्यापारी संघटनेनेही आपली भूमिका जाहीर केलेली नाही
www.konkantoday.com