निवडणूक आयोगाची ही भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची – शिवसेनेची टीका
आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आले होते. विशेष म्हणजे ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेनंतर निवडणूक आयोगाने संबंधित ४ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेनं निवडणूक आयोगावर सडकून टीका करत निवडणूक आयोगाची ही भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची असल्याचं म्हटलं आहे.
www.konkantoday.com