दहावी, बारावीच्या परीक्षांच्या वेळेत बदल करून त्या सकाळ सत्रात घ्याव्यात शिक्षक भारती संघटनेची मागणी

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुलांना परीक्षा देताना त्रास हाेण्याची शक्यता अधिक आहे. वाढत्या तापमानाचा विचार करून दहावी, बारावीच्या परीक्षांच्या वेळेत बदल करून त्या सकाळ सत्रात घ्याव्यात, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button