
राजापूर येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्याची मागणी
राजापूर यापूर्वी तीन वेळा कोविड मुक्त झालेल्या राजापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने तालुक्यात कोविड सेंटर उपलब्ध नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना रत्नागिरीला हलवावे लागत आहे. राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत तालुक्यात कोविड सेंटरबाबत प्रश्न उपस्थित केला हाेता. मात्र, अद्यापही तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले नसल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे.
www.konkantoday.com