
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची’, असं ट्वीट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला हाणलाय.कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री ‘मातोश्री’ किंवा ‘वर्षा’ बंगल्यावरुनच अधिकाऱ्यांना सूचना आणि आदेश देत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला हाेता ‘विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा देत आहेत. मी म्हणतो त्यांनी आता रस्त्यावर जरुर उतरावं. पण कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी’, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय
www.konkantoday.com