लॉकडाऊन भीतीमुळे पर्यटकांची कोकणाकडे पाठ
ऐन पर्यटन हंगामात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाकडून लॉकडाऊन जाहीर होण्याच्या शक्यतेने विविध राज्यातून येणाऱ्या पर्यटकांनी येथील पर्यटनाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असून पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एरव्ही पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणार्या कोकणातील विविध किनारे सध्या सुनेसुने बनले आहेत
गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका विविध व्यवसायांना तसेच जास्त करून पर्यटन व्यवसायाला बसल्याचे दिसून आला
www.konkantoday.com