बेपत्ता असलेल्या खेडशी येथील प्रौढाचा मृतदेह खेडशी रेल्वे रुळावर आढळला
गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या खेडशी येथील प्रौढाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी खेडशी रेल्वे रुळावर आढळला. याची ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद सीताराम गवाणकर (५०, रा.खेडशी चिंचवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवार १ एप्रिल राेजी सकाळी ५ वाजल्यापासून अरविंद गवाणकर घरात कोणालाही न सांगता निघून गेले होते. या प्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिसांकडे बेपत्ता असल्याबाबत माहिती दिली होती.
शुक्रवारी सकाळी अरविंद यांचा मृतदेह खेडशी रेल्वे रुळाजवळ आढळला.
www.konkantoday.com