पर्यावरणमंत्री संजय बनसोडे यांना पहिल्या लशींचा डोस एका कंपनीच्या तर दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा, मुंबईतील जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार
मुंबईतील जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. पर्यावरणमंत्री संजय बनसोडे यांना एक महिन्यापूर्वी देण्यात आलेल्या लसीचा पहिला डोस सिरम कंपनीची आणि एक महिन्यानंतर देण्यात आलेल्या लसीचा दुसरा डोस हा भारत बायोटेक म्हणजेच वेगळ्याच कंपनीचा देण्यात आलाय असा दावा पर्यायवरण मंत्री संजय बनसोडे यांनी स्वतः केला आहे.
पर्यावरण मंत्री संजय बनसोडे अधिवेशनानिमित्त मुंबईत असताना त्यांनी पहिला डोस सिरम कंपनीच्या कोव्हिशिल्डचा घेतला होता.काल जो डोस त्यांना देण्यात आलेला होता तो कोव्हॅक्सिनचा म्हणजेच भारत बायोटेक कंपनीचा घेतला आहे असा दावा संजय बनसोडे यांनी स्वतः केला आहे. काल संजय बनसोडे यांना लस घेतल्या नंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लस देणाऱ्या नर्सला कोणती लस दिली असा सवाल केला असता नर्सने कोवॅक्सिन दिल्याची माहिती दिली. आणि त्यानंतर पर्यावरण मंत्र्यांचे धाबेच दणाणले.
“मला चुकीची लस दिली त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. मी मंत्री आहे वाचता येतंय म्हणून मला लक्षात आलं. अडाणी माणसाचं कसं होणार?” असा सवाल बनसोडे यांनी उपस्थित केला आहे
www.konkantoday.com