तटरक्षक दलाच्या दोन अत्याधुनिक बोटींमुळे अलिबाग ते दापोली किनारा अधिक सुरक्षित होणार
रायगड जिल्ह्यांची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी करण्याकरिता भारतीय तटरक्षक दलाच्या आयसीजीएस-अग्रीम व आयसीजीएस-अचूक या दोन अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज व वेगाने मार्गक्रमण करू शकणार्या दोन बोटी तटरक्षक दलाच्या मुरुड तळा अंतर्गत आगरदांडा बंदरात दाखल झाल्याने मांडावा (अलिबाग) ते दापोली (रत्नागिरी) सागरी सुरक्षा अधिक प्रभावी होणार आहे. ५० मीटर लांबी व ७ मीटर रुंदीच्या या अत्याधुनिक बोटींंमुळे अलिबाग तालुक्यांतील मांडवा बंदर ते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या समुद्र किनारपट्टीची प्रभावी व गतीमान सागरी गस्ती या दोन बोटींमुळे आता शक्य होणार आहे.
www.konkantoday.com