डेरवण युथ गेम या राज्यस्तरीय स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील नारगोली गावची क्रांती म्हसकर राज्यात प्रथम
डेरवण युथ गेम या राज्यस्तरीय स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील नारगोली गावची कुमारी क्रांती मिलिंद म्हसकर हिने १८ वर्षाखालील वयोगटात लांब उडी व शंभर मीटर धावणे या दोन क्रीडा प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला सराव करण्यासाठी सुसज्ज मैदान नाही, क्रीडा संकुल नाही अशा प्रतिकुलतेवर तिने मात केली आहे.
डेरवण येथे २४ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत झालेल्या स्पर्धेत विजेती होण्याचा मानही तिने मिळवला आहे. मंडणगड तालुक्यातील नवी दिशा स्पोर्टस अँकडॅंमीच्या एकूण तेरा खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्तम कामगिरी केली. यात मंडणगड एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीने दोन क्रीडा प्रकारात अतिशय उत्तम कामगिरी बजावली
www.konkantoday.com