टक्केवारीवर घर चालवल्यामुळे ठाकरेंना बेरोजगारी कळणार नाही – निलेश राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केलेल्या भाषणात जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी कधी नोकरी, व्यवसाय केला नाही फक्त टक्केवारी वर घर चालवल्यामुळे त्यांना बेरोजगारी म्हणजे काय ते कळणार नाही. अश्या शेलक्या शब्दांत भाजपचे नेते महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी समाचार घेतलाआहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांनी रस्त्यावर जरूर उतरावं कोरोना विरुद्ध लढण्यासाठी असे सांगितले. मात्र भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कधीच घरात बसून कारभार केला नाही रस्त्यावर उतरून जनतेला मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोकणात अतिवृष्टी असो, चक्रीवादळ असो कि कोरोनाची महामारी असो प्रत्यक्षात जागेवर जाऊन पहाणी फायरब्रॅंड नेते निलेश राणे यांनी केले जनतेला आधार देत तात्काळ स्वरूपाची देखील मदत केली. मात्र अश्या संकटात सत्तेत असलेले सेनेचे आमदार, खासदार कोरोना होईल म्हणून स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा फिरकले नाही. महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन, बेड मिळत नसल्याने बऱ्याच कोरोना रुग्णांचे मृत्यु देखील झालेत. याविषयावर मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द देखील काढला नाही.
मुख्यमंत्र्यांनी फक्त विरोधकांवर टीका करण्यापलीकडे काही भाष्य केले नाही. मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की कोरोनाच्या काळात डॉक्टर आणायचं कुठून? हे मुख्यमंत्र्यांना वाक्य शोभत का? कोरोना हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहेत आणि वेगवेगळ्या देशांबरोबर तुलना करत बसलेत. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन जनतेला मोकळं करावं अशी चर्चा देखील जनतेतून होताना दिसत आहे. यावर निलेश राणे यांनी ट्विटद्वारे म्हणाले की, काय महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालाय जो जनतेलाच विचारतो तुम्ही सांगा मी काय करू. मुख्यमंत्री एका राज्याची तुलना वेगवेगळ्या देशांबरोबर करतो तर काय म्हणावं? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com