
जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यात धावला
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे धनगर वस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगर-दऱ्यातून पायपीट करावी लागते
www.konkantoday.com