
रत्नागिरीत श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ
रत्नागिरी : येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने श्री दुर्गामाता दौडला शहरातील मारुती मंदिर येथे संतोष तावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व ध्वजाला पुष्पहार घालून प्रारंभ झाला. दौड मारूती मंदिर, माळनाका, श्री व्याघ्रेश्वरी अंबा माता मंदिर, के. सी. जैन नगर , एकता मार्ग, मारुती मंदिर या मार्गे घेण्यात आली. सुरू झालेली श्री दुर्गा माता दौड विजयादशमी (दसरा) पर्यंत शहराच्या विविध भागात मार्गक्रमण करणार आहे.
२२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मारूती मंदिर सर्कल, शिवतीर्थ एकत्र येण्याचे ठिकाण आहे. सकाळी ५.४५ वाजता एकत्र यावे. उद्या (२३ सप्टेंबर) रोजी मारुती मंदिर, मजगांव रोड, चर्मालय क्रांतीनगर, कोकणनगर, चर्मालय, मारूती मंदिर हा मार्ग आहे. महापुरूष मित्र मंडळ / क्रांतीनगर नवरात्र उत्सव मंडळ या मंडळाला भेट देण्यात येणार आहे. २४ सप्टेंबर रोजी मारुती मंदिर, माळनाका, मेंटल हॉस्पिटल रोड- जेलरोड, माळनाका, मारुती मंदिर हा मार्ग आहे. या दरम्यान महापुरूष बाल मित्रमंडळ, पोलीस महापुरूष तरूण मित्रमंडळ या मंडळांना भेटी देण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर रोजी मारुती मं




