
जीएसटी कराच्या माध्यमातून सार्वकालिक उच्चांकी १.२४ लाख कोटी रुपये संकलित केले गेलेमार्च महिन्यात
अर्थव्यवस्थेवरील करोना साथीचे पाश सैलावत असून, सरलेल्या मार्च महिन्यांत सरकारकडून गोळा करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी महसुलाच्या गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने ही बाब अधोरेखित केली आहे. मार्च २०२१ मध्ये या कराच्या माध्यमातून सार्वकालिक उच्चांकी १.२४ लाख कोटी रुपये संकलित केले गेले आहेत.
आधीच्या फेब्रुवारी महिन्यांतही जीएसटीच्या माध्यमातून सरकारने विक्रमी १.१३ लाख कोटी रुपये गोळा केले होते, तर मार्च महिन्यांतील संकलन हे त्यापेक्षा तब्बल १०,००० कोटी रुपयांहून अधिक १.२३ लाख कोटी रुपये नोंदविण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com