आता केंद्र सरकारने अशीच तत्परता दाखवत पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी -राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे
केंद्र सरकारने बुधवारी रात्री अल्पबचतीवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. मात्र अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला आणि काही तासातच मागे घेतला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निर्मला सितारमण यांचे अभिनंदन करत टोलाही लगावला आहे.
‘अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती’, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
www.konkantoday.com