
रत्नागिरी नगर परिषदेच्या शिळ जॅकवेल या मुख्य पाणीपुरवठा उद्भवावर नवीन पंपिंग यंत्रणा बसविण्याचे कामासाठी रत्नागिरी शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद
रत्नागिरी नगर परिषदेच्या शिळ जॅकवेल या मुख्य पाणीपुरवठा उद्भवावर नवीन पंपिंग यंत्रणा बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कमी सदरील कामास अंतिम स्वरूप देवून नवीन पंपिंग यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणेकामी शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा दि. ५-४-२१ व मंगळवार ६-४-२१ रोजी बंद राहणार आहे. तरी, सर्व नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे. बुधवार दि. ७-४-२१ पासून नियमित वेळेनुसार पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नगरपरिषदेच्या पाणी सभापती व मुख्याधिकारी यांनी जनतेच्या माहितीसाठी कळविले आहे
www.konkantoday.com