
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात
रत्नागिरी जिल्ह्यात तसेच रत्नागिरी शहरात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना कोरोना लस देण्यात येत आहे. शहरातील झाडगाव येथे दोन सत्रात लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता केंद्रावर नागरिकांना लसीचा लाभ घेता येणार आहे. या नागरी आरोग्य केंद्रात आतापर्यंत ३११५ जणांनी लाभ घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ८७ केंद्रांमध्ये आतापर्यंत एकूण ६५,८४२ लोकांनी लाभ घेतला आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रभावी अस्त्र कोविड लसीकरण हे आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत.
www.konkantoday.com