
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर धामणी येथे दुचाकीच्या जोरदार धडकेत गायीचा मृत्यू, दोघे गंभीर
संगमेश्वर धामणी येथे मंगळवारी रात्री दुचाकीने दिलेल्या धडकेत गायीचा
मृत्यू झाला असून दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. योगेश रामदास चव्हाण (३०, सातारा, सध्या रा. वांद्री) व रोहित मोहन चव्हाण (२५, सातारा, सध्या रा. वांद्री) हे दोघे दुचाकीवरून संगमेश्वरच्या दिशेने येत होते. दरम्यान धामणी येथील पंपाजवळ अचानक महामार्गावर गाय आडवी आल्याने दुचाकी थेट गायीला धडकली. धडकेने गाय काही अंतरावर फेकली जाऊन जागीच ठार झाली, तर दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलीस हेडकॉन्स्टेबल किरय मनवल व कॉन्स्टेबल लोखंडे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.
www.konkantoday.com




