
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शेकडो प्रक्रिया उद्योग ठप्प
आता कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घेण्यात आल्याच्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे कोकणातील प्रक्रिया उद्योग संकटात सापडले आहेत.
मार्च ते मे महिना या तीन महिन्याच्या कालावधीत ही फळं गोळा करत त्यापासून आंबापोळी, करवंद जाम, फसणपोळी, आमरस यासारखे इतरही अनेक पदार्थ तयार केले जातात. पण, यंदा मात्र साऱ्या गोष्टी जैसे थे राहिल्या आहेत.त्यामुळे करोडो रूपयांची उलाढाल देखील ठप्प झाली असून हजारो जणांचा हातचा रोजगार देखील हिरावला गेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शेकडो प्रक्रिया उद्योग असून या साऱ्या उद्योगांमध्ये लाखो टन फळांवर ही प्रक्रिया होते. त्यामुळे यातून करोडो रूपयांची उलाढाल होते
www.konkantoday.com