
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यातील तिहेरी तटबंदीतील काही भाग कोसळून आठ महिने झाले तरी दुर्लक्ष
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यातील तिहेरी तटबंदीतील दुसरी चिलखती तटबंदी पायाजवळून ढासळून आठ महिने झाले मात्र अद्याप या तटबंदीच्या कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. याकडे पुरातत्व विभागाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
विजयदुर्ग किल्ल्यातील दुसरी चिलखती तटबंदीचा भाग मोठ्या प्रमाणात ४ऑगस्ट २०२० रोजी पहाटेच्या सुमारास जोरदार झालेल्या पावसात कोसळला हाेता
www.konkantoday.com




