शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दर चार दिवसानंतर वेगळा आदेश काढतात, जिल्हाधिकारी कोणाच्या सल्ल्याने वेगवेगळे आदेश काढतात मला माहित नाही — शिवसेना आमदार भास्कर जाधव
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दर चार दिवसानंतर वेगळा आदेश काढत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. जिल्हाधिकार्यांच्या अशा वागण्यामुळे गावोगावी आणि भावाभावांमध्ये भांडणे होण्याची शक्यता आहे असे म्हणत शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनावर तोफ डागली शिमगोत्सवातील रूढी – परंपरांची माहिती घेवून जिल्हाधिकार्यांनी निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यानी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिमगोत्स कसा साजरा करावा याबाबत जिल्हाधिकारी आदेश काढतात. तो जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात पोहचेपर्यंत जिल्हाधिकार्यांचा आदेश बदललेला असतो. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा दोन ते चार दिवसानंतर वेगळा आदेशकाढतआहेत . जिल्हाधिकार्याचा आदेश गावात पोहचल्यानंतर लोकांमध्ये मतभेद तयार होऊन आपसात भांडणे होण्याची वेळ आली आहे. एकाच्या हातात एक आदेश आहे तर दुसर्याच्या हातात दुसराच आदेश असतो. काही गावातील लोकांमध्ये मतभेद तयार झाले. आपसात भांडण नको म्हणून लोक माझ्याकडे येवून मार्ग काढण्याची मागणी करत आहेत. जिल्हाधिकारी कोणाच्या सल्ल्याने वेगवेगळे आदेश काढतात मला माहित नाही असेही जाधव यांनी म्हटले आहे एकूणच जाधव यांनी जिल्हा प्रशासनाच्या सततच्या बदलत्या आदेशाबाबत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे
www.konkantoday.com