मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे एच एन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मंगळवारी (दि.३०) रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले. रश्मी ठाकरे यांना २३ मार्च रोजी कोरोनाची बाधा झाली होती. तेव्हापासून त्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गृह विलगीकरणात होत्या. तेथे त्यांच्यावर वर्षा येथील निवासी डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. मात्र, थोडा त्रास वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रिलायन्समध्ये भरती होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
www.konkantoday.com