“प्र.ल.” माहितीपट ४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर कै.प्र.ल.मयेकरांच्या ७५ व्या जन्मदिनी प्रसारण
रत्नागिरी दि.-
मराठी रंगभूमीला अजरामर संहिता देणारे,१९८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या ७५ व्या जन्मदिनी त्यांच्या रंगभूमीवरील एेतिहासिक कार्याला उजाळा मिळणार आहे.रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमीने कै.प्र.ल.मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर तयार केलेला माहितीपट रविवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
अग्निपंख,दीपस्तंभ,रातराणी,गंध निशिगंधाचा,पांडगो इलो रे बा इलो,अथ मनुस जगन हं,तक्षकयाग,डॅडी आय लव्ह यू,काळोखाच्या सावल्या सारखी रंगभूमी गाजवणारी नाटकं,पुत्रवती,जोडीदार सारखे सुपरहिट चित्रपट,रक्तप्रपात,रोपट्रिक,अतिथी,आय कन्फेस सारख्या एकांकिकांचा अजरामर ठेवा मराठी रंगभूमीला देऊन रंगभूमी समृध्द करणारे नाटककार प्र.ल.मयेकर यांचा जन्म ४ एप्रिल १९४६ रोजी आडिवरेतील कोंभेवाडीत झाला.प्रतिभासंपन्न नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांचा ४ एप्रिल रोजी ७५ वा जन्मदिवस.त्यानिमित्ताने १९८० च्या दशकातील मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाला उजाळा मिळणार आहे.समर्थ रंगभूमी निर्मित प्र.ल.हा माहितीपट रविवार सकाळी १० वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.प्र.ल.माहितीपटाची संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांनी केले असून निवेदन अभिनेता अविनाश नारकर,प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले आहे.संकलन धीरज पार्सेकर,ध्वनीमुद्रण उदयराज सावंत,पार्श्वसंगीत योगेश मांडवकर यांचे असून माहितीपटाचे दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांचे आहे.देवीलाल इंगळे यांचे निर्मितीसहाय्य लाभले आहे.
www.konkantoday.com