
पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंकिंगसाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत आज संपणार
पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंकिंगसाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत बुधवारी संपत आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर आर्थिक व्यवहार अडचणीत येण्यासह मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाने २०१९ मध्ये आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची योजना पहिल्यांदा लागू केली. त्यानंतर या प्रक्रियेला सातत्याने मुदतवाढ देण्यात आली; मात्र आता नवीन मुदत देण्यात येणार नसून, ३१ मार्च २०२१ हीच अंतिम मुदत राहील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com