
जमिनीच्या वादातून रत्नागिरी तालुक्यातील काळाबादेवी येथे पोस्टमनला मारहाण
जमिनीच्या वादातून रत्नागिरी तालुक्यातील काळाबादेवी येथे एका पोस्टमनला त्याच्या शेजारी राहणाऱ्या तीन भावांनी शिवीगाळ करत जोरदार धक्काबुक्की करून पलायन केले. यामध्ये पोस्टमनच्या डोक्याला दुखापत होऊन ते जखमी झाले. जयसिंग मालगुंडकर असे त्यांचे नाव आहे.
जयसिंग विठ्ठल मालगुंडकर(६०, रा. मालगुंडकरवाडी, काळबादेवी) हे पोस्टमन गावात कार्यरत आहेत. २७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे ते टपाल वाटपाचे काम करत होते. त्यावेळी त्यांचे शेजारी स्वामीनाथ शंकर मालगुंडकर, जिद्दसिंग शंकर मालगुंडकर, रणजितसिंग शंकर मालगुंडकर (सर्व रा. काळाबादेवी) यांनी जयसिंग यांना जोरदार शिवीगाळ करुन मारहाण केली
www.konkantoday.com