कोरोनाचे नियम न पाळणार्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध प्रसंगी फौजदारी कारवाईसुद्धा करण्यात येईल -सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. शासनाच्या आदेशानुसार त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीप्रमाणे संबंधित जिल्हाधिकार्यांना जिल्ह्यातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढण्याबाबत सर्वाधिकार देण्यात आले आहेत.त्यानुसार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत नियम कायम ठेवण्यात आले असल्याची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. कोरोनाचे नियम न पाळणार्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध प्रसंगी फौजदारी कारवाईसुद्धा करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
www.konkantoday.com