
मसापच्या राजापूर अध्यक्षपदी मदन हजेरी यांची नियुक्ती
राजापूर : मसापच्या राजापूर शाखेचा शुभारंभ करण्यात आला. राजापूर अध्यक्षपदी साहित्यिक मदन हजेरी यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मसापचे उपाध्यक्ष आणि रजिम बँकेचे चेअरमन तानाजीराव चोरगे हे होते. यावेळी मसापची राजापूर शाखा कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी प्रा. प्रकाश देशपांडे, सुनिताराजे पवार उपस्थित होत्या. प्रारंभी मसापने महाराष्ट्रभर केलेल्या कामाचा आढावा जोशी यांनी घेतला. आज मराठी साहित्य शहरापुरते मर्यादित राहिलेलं नाही तर ग्रामीण भागातील अनेक लेखक नव्या उमेदीने लिहू लागलेत, असेही ते म्हणाले.
राजापूर तालुका मसापच्या उपाध्यक्षपदी गजानन पळसुलेदेसाई, कोषाध्यक्षपदी संजय बाकाळकर, सचिवपदी प्रदीप लिंगायत, सदस्यपदी मंदार सप्रे, अनंत देशकुलकर्णी, राजीव राणे, संजय घाणेकर, मनीषा गवाणकर यांची निवड करण्यात आली. यावेळी रजिम बँकेचे संचालक महादेव सप्रे यांनी सर्वांचा सत्कार केला. माजी संचालक डॉ. माधव सप्रे, समीर देशपांडे, प्रकाश आमकर, रवी जाधव, तालुक्यातील सर्व शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते.